जनतेज न्युज

काँग्रेसने केलेल्या आरोपाला नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे

प्रतिनिधी, ठाणे : खाडीकिनारी जवळपास 20 फूटापर्यत आत डेब्रिज टाकून त्या जागेवरच संरक्षण भींत बाधण्यात येत आहे व त्याठीकाणीच ठाणे महापालिकेच्या खर्चातून मच्छी मार्केट उभारण्यात येत आहे ,संरक्षण भींतीकरिता खाडीकीनारी टाकण्यात आलेले डेब्रिज मुळे या ठीकाणी नव्याने झोपडपट्टी उभी राहण्याचा शकता आहे स्थानिक नगरसेवकाच्या  ऑफिस समोर असताना सदरची बाबत त्यांना दिसत नाही का असा आरोप नाव न घेता  ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी नगरसेविका नम्रता कोळी यांच्यावर केला होता यावर स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी व भाजपाचे चिटणीस जयेंद्र कोळी यांनी या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. निवडणूक आल्या कि काही जण माहिती न घेता बिनबुडाचे आरोप करत असतात. डेब्रिज टाकून नव्हे तर डेब्रिज काढून खाडी मोकळी करून संरक्षण भीत उभारण्याचे काम सुरु आहे आम्ही कोळी आहोत खाडीच्या सुरक्षेबाबत आम्हाला कोणीही सांगू नये. खाडीच्या सुरक्षासाठीच नगरसेवक निधीतून २५ लाख खर्च करून डेब्रिज काढून याठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात येत आहे. तसेच याठिकाणी कोणतेही गाळे उभारून मच्छि मार्केट उभारण्यात येणार नव्हते उलट याठिकाणी रस्त्यावर बसून मच्छि विकणाऱ्या महिलांना निवारा म्हणून निवारा शेड उभारण्यात येणार होते परंतु हा प्रस्ताव देखील रद्द झाला असल्याचे स्थानिक नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी सांगितले