जनतेज न्युज

काँग्रेसबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांनी दिली प्रतिक्रिया.

प्रतिनिधी , मुंबई : आज मुंबईत काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, सचिन सावंत यांसह अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्तिथ होते.

यावेळी बोलताना ‘बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसने विकासाची वाटचाल करून देशाला पुढे नेलं, असे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं.संजय राऊत हे पत्रकार आहेत, संजय राऊत जे बोलतात ही त्यांची अधिकृत भूमिका नाही,सेनेने अशी अधिकृत भूमिका मांडली तर बघू असा,असे वक्तव्य थोरात यांनी केले