जनतेज न्युज

काँग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार – मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप

प्रतिनिधी , मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जातोय. अशावेळी मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय.
काँग्रेस हायकमांडकडून शनिवारी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर भाईंनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील, अशी घोषणाच जगताप यांनी केली आहे. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेन. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करेन, असंही भाई जगताप म्हणाले.