प्रतिनिधी , कोल्हापूर : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत.आजच्या घडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे गेले आहेत. पेट्रोल दराची ही सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ यांनी, ‘वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांचे कंबरडेच मोडले आहे’,असे मत व्यक्त केले आहे.
याचसोबत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कि, ‘हाडं गोठवणार्या थंडीतही दिल्लीमध्ये शेतकरी गेल्या ६० ते ६५ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. त्यातील ५० ते ६० जणांचा जीव गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर त्यांच्याशी संवाद साधायलाही वेळ नाही. उलट शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून त्यांची ते थट्टा करीत आहेत. याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल.
