जनतेज न्युज

कामाच्या वादातून तरुणाची हत्या

प्रतिनिधी, नागपुर :  नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेझनबाग मध्ये काल रात्री महादेव सोनूले नामक 63 वर्षीय वृद्ध इसमाने त्यांचे सहकारी तिलक चव्हाण (32)च्या डोक्यात लाकडी दांडूने वार करून हत्या केली. आरोपी  महादेव सोनूले हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतात तर तिलक चव्हाण हा त्यांचा हेल्पर म्हणून काम करतो. सोमवारी संध्याकाळी हे दोघेही एका बांधकाम साईट वर काम करत असताना दोघांमध्ये वाद झाला. यावेळी मृतक तिलक चव्हाण याने महादेव सोनूले यांना आई वरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संतापलेल्या महादेव सोनूले यांनी तिलकच्या डोक्यावर लाकडी दांडूने वार केला. जखमी तीलकला रक्ताच्या थारोळ्यात कोसळला असता स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.