जनतेज न्युज

कायदेशीर मागाण्यांसाठी महापालिका आरोग्य सेविकांचे आझाद मैदानात कामबंद आंदोलन

प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्यसेविकांनी आपल्या कायदेशीर मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे. सदर आंदोलन महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे ८ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येत आहे.

सरकारने मंजूर केलेल्या किमान वेतनाचा निर्णयाची मुंबई मनपा अंमलबजावणी करत नाही आणि महाविकास आघाडी सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याची आरोग्य सेवकांची तक्रार आहे. आरोग्य सेवकांची मनपाकडून होणारी पिळवणूक अख्ख्या जगाला कळावी म्हणून संघटनेने हा मार्ग निवडला आहे.

तसेच, सुप्रीम कोर्टात प्रकरण चालू आहे असे वारंवार सांगण्यात येते. किमान वेतन आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण यांचा कोणताही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकार यांनीदेखील न्याय न देण्याचे धोरण चालू ठेवले आहे. राज्य शासनाच्या आदेशाचे नक्की काय करावे याबाबत निर्णय आवश्यक आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.