प्रतिनिधी, सिंधुदुर्गा : दोन दिवसापूर्वी तारकर्ली येथे संरक्षण बंधाऱ्याचे काम सुरू झालं, मात्र यासाठी एक परवानगी राहिली होती ती पर्यावरण खात्याची मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याने ही परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक आमदारांनी केली असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला यावेळी त्यांनी स्थानिक आमदारांसह पर्यावरण मंत्री यांचा समाचार घेतला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून देवबाग तारकर्ली येथे एक कोटी निधी बंधारा दुरुस्तीसाठी देण्यात आला होता याला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती मात्र पर्यावरण खात्याची परवानगी नसल्याने हा बंधाऱ्याचे काम थांबवण्यात आले असल्याची माहिती यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दिली. जर एक तरी जीव गेला , तर तुम्हाला मालवण सोडा सिंधुदुर्गात सुध्दा फिरायला देणार नाही.
काहीतरी लाज शिल्लक आहे की नाही, की राजकारणासाठी विकुन टाकलात.
