जनतेज न्युज

किनवट मध्ये किसान सभेच्या वतीने, शेतकरी कायदे रद्द करणाच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन

प्रतिनिधी , नांदेड : किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे तसेच शासकीय कंपन्या विकणे बंद कराव्या अशा विविध मागण्यासाठी आज १९ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट व सहस्रकुंड रेल्वे स्टेशन येथे किसान सभेचे कॉम्रेड अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली आदिलाबाद ते मुंबई जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसला थांबवत आंदोलन करण्यात आले. किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने ८५ दिवसाच्या नंतर समग्र देशांमध्ये रेलरोको आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
त्याप्रमाणे किनवट सहस्त्रकुंड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हवे होते ते कायदे स्वामी कमिशन कायदा व हमीभाव व कर्जमाफीचा कायदा कचर्‍याच्या टोपलीत टाकला आणि अदानी अंबानीला हवा तसा कायदा चोर दरवाजाने आणला असल्याचे सांगत हे कायदे रद्द झाले पाहिजे, यासाठी हा रेलरोको आंदोलन करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे कॉम्रेड अर्जुन आडे यांनी यावेळी दिली.