जनतेज न्युज

किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ED च्या कार्यालयात लागला – अनिल गोटे (माजी आमदार, धुळे शहर)

प्रतिनिधी, धुळे : केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात महाविकास आघाडीचे गांधी पुतळा परिसरात माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन…

 केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा कुटील डाव भाजपच्या केंद्र सरकार कडून केला जात असल्याचा आरोप लावत मंत्री नवाब मलिक यांनादेखील याच भावनेतून खोटे आरोप लावत ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकवण्यात आले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा येथे धरणे आंदोलनामध्ये सामील झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. भाजपच्या केंद्र सरकारच्या ED च्या गैरवापराचा निषेध केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे बोलताना सांगितले की, आजच्या आंदोलने विरोधी पक्षाला दाखवून दिले आहे की, मंत्री नवाब मलिक हे या लढाईत एकटे नाही तर त्यांच्यासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आहे. तसेच केंद्र सरकारच्या दडपशाहीचा आणि हुकूमशाही चा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो.

किरीट सोमय्या यांच्या वर बोलताना यांनी बोलताना सांगितले कि किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ED च्या कार्यालयात लागला आहे. तसेच पुढील आठवड्यात भाजपच्या एका मोठ्या नेत्यांविरोधात मी ED मध्ये पुरव्या सकट तक्रार दाखल करणार आहे. ED निष्पक्षपणे त्या प्रकरणात कारवाई करावी. तसेच भाजपच्या प्रदेश प्रवक्ते असलेल्या अजित चव्हाण यांनी 24 तास आधीच कसे सांगितले की महाविकास आघाडीच्या एका नेत्याला कोठडी होणार आहे यावरून स्पष्ट होते की केंद्र सरकार हा आपल्या सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला.

यावेळी  काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शाबीर शेठ तसेच माजी आमदार शरद पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक नेते मंडळी तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाल्याचे बघावयास मिळाले.