महाराष्ट तिसऱ्या लाटेच्या संकटात असतांना केंद्रा कडून दुजा भाव…
लसीकरण मुळेच कोरोना आटोक्यात-मंत्री डॉ शिंगणे
प्रतिनिधी , बुलडाणा : अँकआज बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी च्या कोरोना योद्धा यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बातचीत करतांना केंद्र सरकार वर ताशेरे ओढत केंद्रा कडून लसी चा पुरवठा पुरेपूर होत नाही, त्यामुळे अडथळे येतात तर राज्यात कोरोना चा दर कमी झाला तो लसीकरण मुळेच झाला, पण राज्य हे 100%लसीकरण युक्त व्हावं यासाठी केंद्रात ने मदत करायला पाहिजे, पण तसे होत नाही. आणि आता तिसरी लाट येणार त्यासाठी सर्वपरीने महाराष्ट्र सरकार तयार आहे सर्व सुविधा युक्त तयारी महाराष्ट्राची झालेली आहे असं ही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बोलतांना व्यक्त केलं.
