जनतेज न्युज

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे आदी नेते राळेगणसिद्धी मध्ये दाखल..

प्रतिनिधी , अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून आपल्या विविध कृषी मागण्यासाठी आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी आंदोलन करू नये यासाठी आता केंद्र सरकार पातळीवर प्रयत्न सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारनंतर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी स्वतः अण्णांशी बोलण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री गिरीश महाजन आदी नेते त्यांच्यासोबत आहेत. एकंदरीत केंद्र सरकारने अण्णांनी आंदोलन करू नये यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठीचा एक प्रस्ताव घेऊन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धीमध्ये आलेले असून अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सध्या बैठकीमध्ये सुरू आहे.  आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक नेते राळेगणसिद्धीमध्ये येऊन गेलेले असताना सर्वांनी भेटीत चर्चा केली मात्र आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं प्रत्येक वेळी अण्णांनी सांगितले आहे. त्यामुळे आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीमध्ये बोलणी करण्यासाठी आल्यानंतर अण्णांची भूमिका आंदोलनाबाबत काय असेल याबाबत सध्या उत्सुकता आहे.