जनतेज न्युज

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नवीन नियमानुसार पीओपी मूर्तिकारांवर संकट,मूर्तिकारांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

प्रतिनिधि , अमरावती : केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नवीन नियमानुसार पीओपीच्या मूर्तींवर पृर्णपणे बंदी घातल्याने पीओपी मूर्तिकारांसमोर संकट निर्माण झाले आहे. मूर्तिकार वर्षभर पीओपी पासून मूर्ती बनवत असतो, त्याच व्यवसायावर त्यांचे उदरनिर्वाह चालत असते. मात्र,आता पीओपीच्या मूर्तींवर बंदी आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पीओपीच्या मूर्तिकारांनी मोर्चा काढत केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या जाचक अटी दूर कराव्यात व आम्हाला पीओपी पासून मूर्ती बनवण्यासाठी मुभा द्यावी व डॉक्टर जयंत गाडगीळ बायोमेट्रिक लॅब पुणे यांच्या पीओपी विघटनाच्या प्रयोगाचा राज्यसरकारने विचार करावा या मागणीसाठी आज जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.