जनतेज न्युज

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करीत शिवसेनेने मारली दानवे यांच्या प्रतिमेला जोडे

प्रतिनिधी , सोलापूर : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना आंदोलन छेडलय. गेली सोळा दिवस झाले कडाक्याच्या थंडीमध्ये बळीराजा आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. याच दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते . या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा दानवे यांनी केला होता. दानवेच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता राज्यामध्ये उमटण्यास सुरुवात झाली. शिवसेना दानवे यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाली असून आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकार्‍यांच्या वतीने दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त करत शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.