जनतेज न्युज

केंद्र सरकारचा कृषि विधेयक शेतकऱ्यांच्या हिताच, हे विधेयक तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी आणल्याचा केला दावा

प्रतिनिधी : आज भारत बंद ला महा विकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे त्याचा संमिश्र प्रतिसाद वसई-विरारमध्ये पाहायला मिळतात हा बंद शेतकऱ्यांचा नसून राजकीय पोळी भाजण्यासाठी महाविकासआघाडी करीत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वसईत केला धडक कामगार युनियनच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आले होते त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महा विकास आघाडी वर घणाघात केला