प्रतिनिधी , सोलापूर : केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे केले आहेत. त्या अनुषंगाने आज भारत बंदची हाक देण्यात आली होती.त्याला सोलापुरातील कामगार व शेतकरी संघटनेने पाठिंबा देत सोलापुरातील असलेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी बंद करण्याचे आवाहन यावेळी कामगार संघटनेने केले.या आंदोलनावेळी माकप च्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी माकप नेते माजी आ.नरसय्या आडम मास्तरसह आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना midc पोलिसांनी ताब्यात घेतले.
