जनतेज न्युज

केंद्र सरकारच्या कृषी विधेयक समर्थनार्थ शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आला आहेेे.सांगलीमध्ये मोर्चा काढून शेतकरी संघटनेने नव्या कृृषी कायद्याचे समर्थन करत सुरू असलेला आंदोलन केवळ राजकारणासाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रतिनिधी , सांगली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्राच्या कृषी धोरणाला विरोध म्हणून देशभर आज राजकीय आणि सामाजिक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र सांगलीमध्ये शेतकरी संघटनेने या आंदोलनाच्या विरोधात प्रति आंदोलन केले आहे.केंद्र सरकारचे नवा कृषी कायदा शेतकर्‍यांच्या हिताचे आहे, यामध्ये थोड्याफार त्रुटी आहेत,ते सरकार दूर करेल, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून झुंडशाहीने लुटणारे सर्व आज एकवटले आहेत आणि शेतकरी हिताच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत, असा आरोप करत शरद जोशी प्रणीत संघटनेने सांगली शहरातून संघटनेने मोर्चा काढत, नव्या कृषी कायद्याचे समर्थन करत स्वागत केले आहे.शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला गणपतीपासून प्रमुख मार्गावरून हा मोर्चा खडक शेतकरी संघटनेचा नगर कृषी कार्याला पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले .