जनतेज न्युज

कोटा येथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रीयांचा परतण्याचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी , मुंबई : लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या कोटा येथे महाराष्ट्रातील दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी-नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था झाली आहे. त्यांच्या प्रवासाबाबत मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय यावलकर यांनी मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांना केले आहे.

या लोकांचा प्रवास या दोन राज्यांमधून बसने होणार आहे. हे प्रवासी लॉकडाऊनच्या सर्व निकषांचे पालन करतील. त्यांना १४ दिवस विलगवासात ठेवण्यात येईल, असे आश्वासन यावलकर यांनी संबंधित दोन्ही राज्यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.