जनतेज न्युज

कोणत्याही निर्णयाविना तासगाव पोलीस ठाण्याचे पी आय राजेंद्र सावंतरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना प्रशासनाचे बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे…

प्रतिनिधी ,तासगाव : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा व पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव यांनी शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार शेतकऱ्याला गाळप झालेल्या उसाचे 14 दिवसाच्या आत एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम राहिले… त्यावेळी कारखान्यातर्फे आरडी पाटील उपस्थित होते..  त्यांनी सात ते आठ वर्षानंतर कारखाना आता चालू झालेला आहे.. साखर आयुक्तांनी शी एफ आर पी  किती द्यायचे  याविषयी  मार्गदर्शन मागवले आहे..  इतर कारखान्यांच्या बरोबर अठ्ठावीस शे पन्नास रुपये दर जाहीर केलेला आहे.. असे सांगितले इतर कारखाने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना उसाचे पैसे देतील त्याचप्रमाणे हा कारखाना सुद्धा देईल असे म्हणता च स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोनहिरा उदगिरी या कारखान्यांना जमते त्याप्रमाणे तुम्ही द्या असे म्हणता च  कारखाना प्रशासनाने त्याबाबत बोलताना असमर्थता दर्शवली… बराच वेळ चर्चेनंतर कोणताही निर्णय झाला नाही त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितले जोपर्यंत एक रक्कम मिळणार नाही.. तोपर्यंत सनदशीर मार्गाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच राहील… त्यावेळी तासगाव पोलीस स्टेशनचे पीआय राजेंद्र सवंतरे साहेब यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले…