जनतेज न्युज

कोपरगाव शहरात मॅरेथॉन स्पर्धा; हजारो नागरिकांचा सहभाग

प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने “रन फॉर हेल्थ” भव्य मॅरेथॉन स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेला साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी झेंडा दाखवत स्पर्धेला सुरूवात झाली. यामधे शालेय विद्यार्थी, लहान मुले तरूण, तरूणी  सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.