नागरीकांनी थेट सेंटरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी सुरज मांढरे
प्रतिनिधी, नाशिक : जिल्हयातील कोरोनाविरुद्धची लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे, आपण सर्वच याची व्याप्ती कमीत कमी कशी करता येईल यावर भर देत आहोत. ही लढाई अजुन किती दिवस चालेल याचा कुठलाही अंदाज नाही. त्यामुळे भविष्यातील बरेच दिवस अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल असे गृहीत धरुन जिल्ह्यात ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
कोविड १९ टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी, निलेश सागर, सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कुमार आशिर्वाद, निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय, डॉ.अनंत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, श्री.भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.मांढरे म्हणाले, एकीकडे आरोग्य विभागाचे सबलीकरण करत असतानाच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकुल परिणाम फारसा होऊ नये यासाठी हे ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ कार्यान्वित करत आहोत. या सेंटर मध्ये जिल्ह्यातील २० अधिकाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्यातील प्रत्येकाला एक जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. जे उद्योगधंदे कलम १४४ मधुन वगळले गेले आहेत, जे जीवनावश्यक आहेत ते सुरळीत चालु राहतील. जसे भाजीपाला, किराणा, औषधे वेळवर मिळण्यासाठी तसेच दैनंदिन वित्तीय व्यवहार कमीत कमी बाधीत होतील यासाठी यातील प्रत्येक अधिकारी आपआपली जबाबदारी पार पाडेल.
कोविडच्या लढ्यात प्रत्येकाने सर्व प्रथम १४४ च्या आदेशाचे पालन करायला हवे. कारण कुठलेही असो सार्वजनिक असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल प्रत्येकाने बंधने पाळायला हवीत. कारण ही केवळ कायदा सुव्यवस्थेची संदर्भातील लढाई नाही, एखाद्या घटनेपुरती मर्यादित लढाई नाही. तुमच्या-आमच्या पैकी प्रत्येकाला धोका पोहचविणारी ही एक जागतिक आपत्ती आहे. तिचा आपण सामना करतो आहोत त्यामुळे यात सर्वांनी स्वत:चे आणि एकमेकांचे संरक्षण करायला हवे. १४४ च्या कलमातील बारकावे, पळवाटा शोधुन अनुचित प्रकार करणे तसेच गर्दी करणे अशा प्रकारची चुक कोणीही करु नये. त्यामुळे कदाचित आपणास खुप मोठ्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो व त्याची जबाबदारीही आपणा सर्वांवर निश्चित केलेली आहे. जिल्हयातल्या सकंटसमयी प्रशासनास मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांचे समन्वयन व नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील नागरीकांना आम्ही अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल नंबर्स उपलब्ध करून देत आहोत. नागरिकांनी आपल्या कामाच्या संदर्भात थेट त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अव्याहत सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जे किराणा दुकानदार अथवा वैद्यकीय व्यवसायिक अथवा विक्रेते विनाकारण बंद ठेऊन अथवा त्याच्या वेळा कमी करून नागरिकांना अडचणीत आणतील अशा लोकांविरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा करण्यास प्रशासन मागे बघणार नाही असेही,जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी केले नमूद केले आहे.
इमर्जन्सी ॲक्शन सेंटरचे ‘संकट सोबती’
१. निलेश सागर अपर जिल्हाधिकारी , नाशिक ९४२२२२७९९० विविध विभागांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय क्षेत्रीय यंत्रणा, व्हॉटसॲप/ लघुसंदेश, ईमेल इ.द्वारे पाठविणेची सोय करणे. शासनाच्या विभागांकडून निर्गमित केलेल्या धोरणात्मक निर्णया संदर्भात क्षेत्रीय स्तरावर संबधित विभागामार्फत अंमलबजावणी करणे. शासनाने घेतलेल्या निर्णया संदर्भात जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेणे व EOC मध्ये सर्व माहिती दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत अद्ययावत ठेवणे. निम्न अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव, शंका इ.बाबत मार्गदर्शन पर कार्यवाही करणे, समन्वय राखणे.
२. कुमार आशिर्वाद,सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक ९८७१०१७५९६ उपचाराकरिता आवश्यक असलेली विविध साधन व साहित्य यांचे तांत्रिक विनिदेष निश्चित करणे व खरेदीची सर्व उपाययोजना करणे. डॉ.अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय, नाशिक ९८८१७३३३४५ वैद्य.महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे व त्यांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोग करुन घेणे. सेवानिवृत्त तज्ञ व अन्य तांत्रिक वैद्यकीय सेवा संलग्न अधिकारी/ कर्मचारी यांची जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी नियोजन करणे.
३ श्री.भागवत डोईफोडे, निवासी उप जिल्हाधिकारी, नाशिक ९४२३७८५७८५ कार्यालयाचे नियमित प्रशासकीय कामकाज बाधित होऊ न देणे व तातडीचे संदर्भ निकाली काढणे
४. अरविंद नर्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक ९४०३६८९४८७ आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंचा नियमित स्वरुपात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी.
५. अरविंद अंतुर्लिकर, उपजिल्हाधिाकरी प्रशासन नाशिक ९५४५५७३१०९ विविध स्वयंसेवी संस्था व नागरिकांकडून देऊ केलेल्या मदतीबाबत योग्य नियोजन करणे व त्यांचे वितरण योग्य व्यक्तींना व योग्यप्रकारे होईल याची दक्षता घेणे.
६. प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी मनपा नाशिक ९४२०७३५८५५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था यासंदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततेसह करावी.
७. नितीन कापडणीस उपायुक्त, मालेगांव महानगरपालिका मालेगांव ९९२३०१४३५३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था यासंदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततसह करावी.
८. देविदास टेकाळे जिल्हा प्रशासन अधिकारी (न.पा.क्षेत्र) ९५९४५५२१५७ सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था या संदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततेसह करावी.
९. श्रीमती वैशाली झनकर-वीर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक ९५९५३३३२२२ सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था या संदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततेसह करावी.
१०. नितीन गवळी प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.महामंडळ नाशिक ९४२२४१०५५७ अनुज्ञेय उद्योगधंदे सोशल डिस्टसिंगचे नियम पाळूनच सुरु राहतील याची दक्षता घेणे तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे.
११. सतिष भामरे व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक ९४२३४४७११२ प्रभावित झालेल्या उद्योग व्यवसाया समवेत विचार विनियम करुन उपाययोजना करणे व कलम १४४ ची प्रभावी अंमलबजावणी करणे.
१२. श्रीमती ज्योती कावरे उपजिल्हाधिकारी, नाशिक ९८५००८९१५५ आपत्कालिन परिस्थितीमध्ये शासनाने उपाययोजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देणे. शासनाकडून करावयाच्या विविध उपाययोजना संदर्भात लोकप्रतिनिधी यांचेकडून प्राप्त होणाऱ्या सुचनांचे संकलन करणे.
१३. संजीव पडवळ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक ९४२२२११९४१ कृषी व पुरक उद्योगधंदे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळुनच सुरु राहतील याची दक्षता घेणे तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे.
१४. दुष्यांत भामरे, सहआयुक्त औषधे प्रशासन, नाशिक ९८२०२४५८१६ औषध निर्मिती व पुरवठा यामध्ये कोणतीही समस्या उदभवणार नाही, साठेबाजी अथवा काळाबाजार होणार नाही तसेच या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची दक्षता घेणे.
१५. चंद्रशेखर साळुंखे सहा.आयुक्त अन्न व प्रशासन नाशिक ९९२१२२६४४८ अन्न निर्मिती व पुरवठा यामध्ये कोणतीही समस्या उदभवणार नाही, साठेबाजी अथवा काळाबाजार होणार नाही तसेच या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची दक्षता घेणे.
१६. निलेश श्रींगी उपजिल्हाधिकारी भूसंपादन राहर नाशिक ९५५२५२९६९७ चेकपोस्ट मॅनेजमेंट व CRPC १४४ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
१७. गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक ९८२२४५८१३० वित्त सेवा सुरळीत सुरु राहतील तसेच प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची दक्षता घ्यावी. अरविंद चतुर्वेद जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, नाशिक ९४२२२८४७६४
१८. राजेश साळवे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नाशिक ९४२२७७०७८५ माहिती व अहवाल संकलीत करणेसाठी सुकर संगणकीय कार्यपद्धती वरील सर्व अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन ठेवणे तसेच वेळोवेळी अद्ययावत करणे.
