प्रतिनिधी ,पंढरपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपन्न होणाऱ्या कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार आहे . पहाटे 2:20 मिनिटांनी विठ्ठलाची महापूजेला सुरवात होईल. तर 3 ते 3:30 माता रुक्मिणी ची महापूजा करण्यात येणार आहे. यावेळी मंदिरात कमीत कमी व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली .
