जनतेज न्युज

कोरोनाच्या संकटात अमिताभ बच्चनची मदत ; मजदूरांच्या कुटुंबियांना देणार महिन्याभरचे राशन

प्रतिनिधी , मुंबई :- कोरोनाच्या लढाईत बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहे . अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया फिल्म एंप्लॉइज कन्फेडरेशनशी निगडीत एक लाख मजदूरांच्या कुटुंबियांना महिन्याभराचं राशन पुरवण्याचा संकल्प केला आहे. या मदत कार्यात सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्स यांचा देखील हातभार असणार आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्कने रविवारी जारी केलेल्या माहितीनुसार, ‘ज्या गंभीर स्थितीत आपण आहोत, त्यामध्ये श्रीमान बच्चन यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला संकल्प ‘व्ही आर वन’चे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि कल्याण ज्वेलर्सने समर्थन केले आहे. यामार्फत देशभरातील एक लाख कुटुंबांना महिन्याभराच्या राशनसाठी वित्तपोषण देण्यात येणार आहे.

दरम्यान करोना आणि लॉकडाउन यामुळे भारतात विविध प्रकारची संकटे उभी राहिली आहेत. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. यानंतर सर्वजण आपापल्या परीने मदत करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.