जनतेज न्युज

कोरोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये; राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल – भुजबळ

प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये व मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर विचार करून राज्यपाल कोश्यारी यांनी त्वरित उद्धठ ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार पद द्यावे असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

“उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर, सामनाचे संपादक, आणि एक कलाकार असल्यानं, त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यास राज्यपालांना कोणतीही अडचण नाही. त्यांना निर्णय घ्यावाच लागेल” असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. परंतु, “राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करु शकत नाहीत. कोरोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये”, असं छगन भुजबळ म्हणाले.

कोरोनाच्या संकटातही मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा विषय वारंवार डोके वर काढत असतो. कारण, देश, राज्य कोरोनाशी लढण्यासाठी एकवटले असले तरी अकल्पित आलेल्या सरकारला आता सहा महिने होत आहेत आणि घटनेतील तरतुदीनुसार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात मुख्यमंत्र्यांना कोणत्या एका सभागृहाचे आमदार होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे मुख्यमंत्रिपद रद्द होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.