जनतेज न्युज

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या ९ ते १० महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्‍याने ऑनलाइन स्‍वरूपात अध्ययन सुरू आहे.

प्रतिनिधी , प्रशासकीय धोरणानुसार आज (दि. ४) पासून शहरासह जिल्‍हाभरात इयत्ता नववी ते बारावीच्‍या वर्गांना सुरवात केली जाणार आहे. या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांनी सूक्ष्म नियोजन, उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे स्‍वागत करण्यासाठी तयारी केली आहे.
नोव्‍हेंबरअखेरीस राज्‍यातील काही जिल्‍हे, शहरांतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आले होते; परंतु नाशिकमध्ये पालकांचा वाढता विरोध लक्षात व कराेना स्थिती पाहता घेता जिल्‍हा प्रशासनाच्‍या स्‍तरावर झालेल्‍या बैठकीत ४ जानेवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला होता. दरम्‍यान, गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी जिल्‍हा प्रशासनाच्‍या झालेल्‍या आढावा बैठकीनुसार आज (दि.४) पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थी येणार असल्‍याने शाळा, महाविद्यालयांकडून प्रांगणात निर्जंतुकीकरण केले गेले आहे. तसेच वर्गांमध्ये शारीरिक अंतर पाळले जाईल, याची खबरदारी घेत तशी बैठकव्‍यवस्‍था करण्यात कर्मचारीवृंद व्‍यस्‍त आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्‍या पालकांना त्‍यांच्‍या नोंदणीकृत व्हॉट्स‌अॅप क्रमांकावर संमतीपत्राची प्रत पाठविली जाते आहे. शाळा-महाविद्यालयांत येताना पालकांचे संमतीपत्र जमा करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सकाळ सत्रात खालच्या वर्गांमध्ये मुलांचे वर्ग भरत आहेत, तर पहिल्या मजल्यावर असलेल्या वर्गांमध्ये मुलींचे वर्ग भरत आहेत मुलांना सनी टायझर देऊन व त्यांची कर्मचाऱ्यांनी करून त्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच बेंचवर सुरक्षित अंतर ठेवून झिगझाग पद्धतीने आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळ सत्र 8 ते 11 व दुपार सत्र 12 ते या वेळेत भरेल. तसेच पहिल्या दिवशी शाळेत जेमतेम 50 टक्केच उपस्थिती होती. त्यातही मुलांपेक्षा मुलींनीच शाळेत येणे जास्त पसंत केल्याचे चित्र आहे,