प्रतिनिधी, कल्याण : दोन वर्षापासून कोरोनामुळे कल्याण मध्ये शिवजयंती साधेपणाने साजरी केली जात होती. यंदा कोरोना रुग्ण आटोक्यात आल्याने शिवजयंतीचा उत्साह कल्याणमध्ये चांगलाच दिसून आला. शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे शासकीय विश्रमगृहापासून ते दुर्गाडी किल्ल्यार्पयत शिव जयंती मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोरोना काळात जेशिवसैनिक ,शिवसेना पदाधिकारी नागरीकांची सेवा करताना मृत्यूमुखी पडले होते. त्यांना आदरांजली वाहणारा चित्ररथ तयार करण्यात आला होता. या मिरवणूकित शिवचरित्रावर आधारित विविध चलचित्रे, आदिवासी तारपा नृत्य ,महिला पुरुष लेझीम पथके मिरवणुकीत सहभागी होते .मिरवणुकीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागतांच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. या मिरवणूकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार विश्वनाथ भोईर, शिवसैनिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
