प्रतिनिधी , जगभरासह राज्यातही कोरोनाचे थैमान सुरु आहे . यापार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात लढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील सज्ज झाली आहे. बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या आनंदवन या संस्थेकडून आता कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी ही संस्था पर्यावरणपूरक कापडाच्या मास्कसह, संपूर्ण चेहरा झाकण्यासाठीचे फेस शील्ड तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.
आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून आनंदवनकडे 40,000 मास्कची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3600 मास्क बनवून तयार आहेत, तर 1390 मास्क वाटण्यातही आले आहेत. याशिवाय मास्कच्या निर्जुंतिकीकरणासाठी देखील दोन खास पाऊच बनवले जात आहेत. संस्थेच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांची निर्मिती केली जात असल्याची माहिती दिली .
, किमान संसर्ग रोखू शकेल असे जाड आणि श्वास घेण्यासही सोयीस्कर असेल अशा फॅब्रिकचा वापर मास्क बनविण्यासाठी केला आहे. हे फॅब्रिक आनंदवनमधील पॉवरलूममध्ये काढलेले आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात असल्याची माहिती लोकबिरादरी प्रकल्पाच्या डॉ.अनघा आमटे यांनी दिली .
