प्रतिनिधी , नागरिकांचे जीवन हे धावपळीचे झाल्याने प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आसल्याचे दिसुन येत आहे.लहान लहान आजारा कडे डॉक्टरांचा सल्ला न घेताच औषधी घेण्याचे प्रमाण वाढत आहे.यामुळे तात्पुरता आजार बरा होतो पण पुर्णपणे बरा होत नाही. याचे गंभीर परिणाम तोच आजार जास्त झाल्यावर दिसुन येतो. त्यासाठी आरोग्य तपासणी करणे ही काळाजी गरज आसल्याचे प्रतिपादनन धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नगरसेवक बंटी मासुळे यांनी आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये केले.
धुळे मनपाचे भाजपचे नगरसेवक बंटी मासुळे यांनी धुळेकर नागरिकांसाठी वयोवृद्ध असतील किंवा लहान बालक असतील या सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केले होते या आरोग्य शिबिराला अध्यक्ष म्हणून धुळ्याचे खासदार तसेच माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे धुळे मनपा चे सभापती सुनील बैसाणे उपमहापौर कल्याणी अंपळकर, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आयोजित आरोग्य शिबिराला धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे अध्यक्ष स्थानी होते, यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, कोरोना अजून गेलेला नाही, ज्या वेक्तीच्या घरात कोरोना येऊन गेला आहे, त्याला विचार कोरोना काय आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका, इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे, आपल्याकडे पण डिसेंबर, जानेवारी मध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेत मास, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स च्या नियमांचे पालन करीत कोरोना पासून आपला बचाव करावा.
