जनतेज न्युज

कोरोना : देशाच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक- शरद पवार

प्रतिनिधी , पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबूक लाईव्हवरून आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाबत देशात महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर चिंता व्यक्त केली. केंद्राने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेश त्यांनी जनतेला दिला. केंद्राची नियमावली पाळणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या महाराष्ट्रातील स्थितीवर भाष्य करताना त्यांनी महासत्ता अमेरिकेचेही उदाहरण दिले. अमेरिकेसारखी महाशक्ती कोरोनामुळं संकटात आहे. मात्र या परिस्थितीत देशाची पाश्चिमात्य देशांशी आपण तुलना करणं योग्य नाही. पाश्चिमात्य देशांपेक्षा भारताची स्थिती बरी असली तरी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन आणि सर्वांनी घरात थांबणेच गरजेचे आहे. लॉकडाऊनचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे, असेही शरद पवार म्हणाले.

कोरोनाने मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण परिसरात हातपाय पसरले आहे. या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेतली तरच अंशतः शिथिलता शक्य असल्याचे शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.