जनतेज न्युज

कोरोना मुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील आय.टी.आय चे प्रवेश तातडीने म्हणजेच केवळ २९ ते ३१ पर्यंत करण्याचे आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक, मुंबई यांनी दिल्याने एकच तारांबळ उडत आहे.

प्रतिनिधी , अमरावती – कोरोना मुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील आय.टी.आय चे प्रवेश तातडीने म्हणजेच केवळ २९ ते ३१ पर्यंत करण्याचे आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक, मुंबई यांनी दिल्याने एकच तारांबळ उडत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया राबवली जात आहे. ३ ते ४ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश केवळ ३ दिवसात करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात रात्री उशिरा तर कुठे पहाटे ४ पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालत आहे.
अमरावती येथील आय.टी.आय मध्ये रात्री २ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण दिवसभर उपाशी-तापाशी प्रवेशासाठी ताटकळत राहावे लागले. विद्यार्थ्याची प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंग व रात्रीच्या कर्फ्यु शासनाच्याच आदेशाचे उल्लंघन या ठिकाणी होत असल्याचे संपूर्ण राज्यभर दिसून आले.
प्रवेशासाठी ग्रामीण भागातील मुलींनाही रात्री उशिरा पर्यंत ताटकळत राहावे लागले व रात्री हॉटेल बंद झाल्याने उपाशी राहण्याची पाळी विद्यार्थी व आय.टी.आय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सुद्धा आली.. ही प्रवेश प्रक्रिया घाईघाईत रात्री बेरात्री न करता सकाळी ८ ते रात्री ६ या वेळातच करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कोरोनामुळे आधीच सहा महिने उशीर झाला जर ४-५ दिवस वाढवून दिले असते तर शांततेत ही प्रक्रिया पार पडली असती अशी भावना विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली.