जनतेज न्युज

कोरोना लसीमुळे नववीच्या मुलाची तब्येत खालावली उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी, सांगली : कुपवाड शहरात एका विद्यार्थ्याला वॅक्सिंगचा डोस दिल्याने चक्क मिळाली डबल नजर, या अजब प्रकारामुळे मुलाची प्रकृती चिंताजनक, वॅक्सिंन मुळेच विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याची पालकांचा आरोप मात्र मनापा प्रशासना कडून सर्व ठीक असल्याची माहिती, उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल,आक्रमक सामाजिक कार्यकर्ते ची कारवाई ची मागणीकुपवाड शहरातील देशभक्त आर.पी.पाटील हायस्कूलमध्ये इ.९ वीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी इलियास युसुफ नदाफ (वय १३ वर्षे) राहणार कापसे प्लॉट कुपवाड याला.३० तारखेला आशा वर्करने व्याकसीनचा दुसरा डोस दिल्याने त्याला आता प्रत्येक वस्तू चक्क दोनवेळा दिसत आहेत त्यामुळे पालक खूप चिंतेत आहेत .सध्या मुलाच्या मेंदूला सूज आली असुन डोळ्याला प्यारीलेस झाले असल्याचे वडील युसुप नदाफ यांना डॉक्टरनी सांगितले आहे.उपचारासाठी त्या विद्यार्थीला मिरज येथिल खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले .परंतु त्यांचे वडील रस्त्यावर बाजारात कपडे विकत असल्यामुळे घरची परिस्थिती बेत्ताची असल्याने त्याला पुन्हा सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानतंर महापालिकेचे डाँ.पल्लवी पाटील व डाँ.वैभव पाटील यांच्या टिमने सिव्हिल मध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांची चौकशी करुन पहाणी केली. यावेळी डाँ.पाटील म्हणाले डाँ.ससे व सिव्हिलचे डाँक्टर व महापालिकेचे डाँक्टर या विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहेत.त्यांची प्रकृती चांगली होईल काहीही काळजी करु नका असे पालकांना त्यांनी सांगितले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसीम गायकवडी म्हणाले.शाळेत लसचा दुसरा डोस दिल्याने हा प्रकार घडला यांची मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संबंधित पालकांना कोणतीही कल्पना दिली नाही. लस ही आशा वर्करने दिली आहे .यावेळी महानगरपालिकेचे डॉक्टर कोणीच उपस्थित नव्हते. त्या मुलाला अगोदोर चक्कर आली होती. असे शाळेकडून पालकांना सांगन्यात आले होते.मात्र त्या मुलाला उपचारासाठी दाखल केल्या नंतर डाँक्टरांनी त्याचा मेंदूला सूज आली असून डाव्या डोळ्याला पॅरलेस झाल्याचे धक्कादायक माहिती सांगितले. उपचारासाठी त्या विद्यार्थ्याला आता सांगली सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले आहे. संबंधित आशा वर्कर मुख्याध्यापक डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.घटने नंतर पालकांनी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांना फोन वरुन माहीती दिली असता.आमच्या शाळेवर काय कारवाई करणार असाल तर करा असे धकादायक विधान काढल्याचे पालकांनी सांगितले व चुकीची वेकसिंन देणाऱ्या आशा वर्कर मुख्याध्यापक,मनपा डॉक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वसीम नायकवडी यांनी केले आहे.एकंदरीत मुलाचे भविष्य अडचणीत आले असून लस सक्ती ची केल्याने आता या मुलाचे काय होणार या विचारा मुळे पालक चिंतेत आहेत परिस्थिती बिकट असून हातात पैसे नाहीत आणि मुलाची अशी अवस्था असल्याने पालक खूप घाबरले असून सामाजिक संघटना प्रशासना विरोध संताप व्यक्त करत असून प्रशासन काय भूमिका घेणार, काय कारवाई करणार या कडे आता जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे