प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूरातील फडके पुस्तक प्रकाशकाने शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा बेकायदेशीर वापर केल्याचं उघडकीस आल आहे. इतकच न्हवे तर फडके प्रकाशकाने प्रकाशित केलेल्या बीए 3 च्या इतिहास पुस्तकात आणि इतर 2 पुस्तकात छत्रपती संभाजीराजे आणि इतर इतिहासाबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याचं देखील समोर आलं आहे.. याबाबत संभाजी ब्रिगेडने आवाज उठविल्यानंतर शिवाजी विद्यापीठाने आक्रमक पवित्रा घेत शिवाजी विद्यापीठाचं नाव वापरून प्रकाशित केलेली पुस्तक तात्काळ मागे घेण्यात यावे अस लेखी समज फडके प्रकाशन ला दिलीय
