जनतेज न्युज

कोविडसंदर्भात राज्यात ५ लाख ९० हजार व्यक्ती क्वारंटाईन

एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ०९ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

प्रतिनिधी, मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ०९ लाख ५४ हजार ७८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ५ लाख ९० हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख १५ हजार ७१० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २५ जून या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २८३ (८५८ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ६९५

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ५ लाख ९० हजार ३८०.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८४ हजार ८२१

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५७

(मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस, ठाणे ग्रामीण २ पोलीस १ अधिकारी, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)

कोरोना बाधित पोलीस – १०७ पोलीस अधिकारी व ९०८ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप – ९३ (सुमारे ३ हजार १४६ लोकांची व्यवस्था)