प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कौटुंबिक जीवनात कलह निर्माण झाला आहे. महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल तिला न्याय मिळावा या मागणीसाठी महिले ने आपल्या मुलासोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील कजबे कऱ्हाड येथील मेनका देविदास मोरे
तिच्या पतीने दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंधातून मेनका देविदास मोरे हिला फारकती न देता लग्न केले त्यामुळे या लग्नाला मेनका मोरे यांचा विरोध असून, यासंदर्भात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल व्हावा म्हणून वारंवार तक्रार देऊन देखील पोलीस या प्रकरणात तक्रार दाखल दाखल करून घेत नाही असा आरोप मेनका देवीदास मोरे यांनी केला आहे.
संबंधित देवीदास मोरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.
