जनतेज न्युज

खऱ्या आरोपींना शोधा अन्यथा भाजप पोलीस ठाण्याला घेराव करणार – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी, कल्याण : सत्ताधाऱ्यावर टीका तर पोलिसाना इशारा

भाजप कार्यकर्ता मनोज कटके याच्यावर हल्ला करणाऱ्या खऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे .पोलीस राजकीय दबावात काम करत असतील तर याबाबत विधानसभेत प्रश्न उचलू ,वेळ पडली तर मोर्चा काढू आणि मी त्या मोर्चात सहभागी होनार आणि  पोलीस ठाण्याला घेराव करणार असा इशारा  राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे .आज राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज कटके या भाजप कार्यकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डोंबिवली एम्स रुग्णालयात आले होते .यावेळी त्यानी सत्ताधार्यावर जोरदार टीका केली .यावेळी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे नगरसेवक पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते

काही दिवसांपूर्वी ठाणे येथील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्याच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि गुन्हा उशिराने दाखल करन्याबाबत फडणवीस यांनी सत्ताधारी व पोलिसांवर टीका केली. फडणवीस यांनी राजकारणातलं  गुन्हेगारीकरणं पाहायला मिळतंय त्याला शासनाचे संरक्षण पाहायला मिळतंय ,महाराष्ट्र अधोगतिकडे जातोय, महाराष्ट्रात पोलीस दल कधी इतक्या राजकीय दबावात काम करत नव्हते, आता जो राजकीय दबाव पाहायला मिळतोय ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही महाराष्ट्राच्या भवितव्य साठी हे अतिशय घातक आहे अस फडणवीस यांनी सांगितले