जनतेज न्युज

खाजगी दवाखाने बंद ठेवणा-या डॉक्टरांवर कारवाई : विभागीय आयुक्त

प्रतिनिधी, पुणे : कोरोनाच्या संकटामुळे पुणे विभागात भीतीपोटी खाजगी दवाखाने बंद करणा-या डॉक्टरांवर त्वरीत आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे भीतीपोटी डॉक्टर खाजगी दवाखाने बंद करण्यात येत असल्याचे समोर आले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टिने ही गंभीरबाब असल्याचे म्हटले आहे.

कोरोना संशयितांवर उपचार करणा-या काही डॉक्टरांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आल्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरांनी त्यांचे खाजगी क्लिनिक बंद ठेवले असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना त्यांत्या जिल्ह्यातील सर्व खाजगी ओपीडी बंद ठेवल्या जात असतील तर त्यांच्यावर थेट आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 व साथ रोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.