जनतेज न्युज

खोटं बोलून मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या नितीन राऊत यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, माजी आमदार नरेंद्र पाटील यांची मागणी

प्रतिनिधी , सध्या पदवीधर आमदारकीच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपण काहीतरी मराठा समाजातील तरुणांसाठी चांगलं केलं आहे हे दाखवण्यासाठी ऊर्जामंत्री खोटी विधानं करत आहेत. सध्या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे ऊर्जा विभागातील जागा एसइबीसी प्रवर्गातील तरुणांना बाजूला ठेऊन भरल्या जातील असं पत्रक महावितरण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे. तरीदेखील जाणूनबुजून ऊर्जामंत्री नितीन राऊत या मुलांना आपण भरती करून घेऊ अशी विधानं माध्यमांमधून करत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रश्नी लक्ष घालून मराठा समाजातील मुलांमध्ये सुरू असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. सध्या नरेंद्र पाटील कोरोना बाधित झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेतं आहेत