प्रतिनिधी , मिर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मिरजेच्या ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरुस सुरू झाला आहे. मात्र, हा उरुस यंदाही कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने भाविकांनी याठिकाणी प्रवेश बंदी आहे. यंदाचे उरुसाचे 646 वे वर्ष आहे. सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचा पार्श्वभूमीवर उरुस रद्द करावा लागला आहे.
मिरजेतील ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गाच्या उरुसाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयानुसार यंदाच्या वर्षीही उरुस रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे भाविकांना याठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. उरुसाच्या पार्श्वभूमीवर दर्गा परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण दर्गा आवारात बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत.पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तर मानाचा चर्मकार समाजाच्या मानाचा गलेफ विधिवत पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.तर दरवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने संगीत उत्सवही पार पडत असतो. संगीत रत्न म्हणून ओळखले जाणारे उस्ताद करीम खाँ यांनी या दर्गा आवारात असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली बसून मिरासाहेब यांच्या चरणी संगीत आराधना केली होती. मिरासाहेब दर्गाच्या उरुसाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत मिरजेत उपस्थितीत लावत संगीत आराधनेची परंपरा जोपासतत.मात्र तोही रद्द झाला आहे.तसेच यापूर्वीच प्रशासन व दर्गा कमिटीने बैठक घेऊन यंदाच्या वर्षी उरुस साजरा होणार नसल्याचे जाहीर केले होते. केवळ दर्गा कमिटीच्या पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत.त्यामुळे भाविकांनी दर्गा परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येऊ नये, असे आवाहनही केले होते.
भक्तांनी आपल्या घरातून प्रार्थना करावी, असे आवाहन दर्गा पुजारी असगर शरीकमसलत यांनी केले आहे.
