प्रतिनिधी , अखेरच्या क्षणी ज्या गाडीत संत गाडगे बाबांचा देह विसावला ती गाडी जुनी व जीर्ण झाल्यामुळे त्या गाडीची डागडुजी करून त्याला रूप देऊन त्या वाहनातून गाडगे महारांजाच्या दहा कलमी संदेशाचा प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला, त्यामुळे बच्चू कडू यांच्या पुढाकाराने गाडगेबाबाचे जुने वाहन अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे होते ते वाहन आज नविन वर्षाच्या पहिल्या दिनी त्याचे लोकार्पण करून पुन्हा या गाडीतुन प्रचार प्रसार होणार आहे
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला.खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला.तर त्यांनी अंधश्रद्धेवर सडकून प्रहार केला होता,तर गाडगेबाबा त्या वाहनातुन कीर्तन करायला जात होते तेच वाहन आज पुन्हा सुरु करण्यात आले,नागरवाडी येथील त्यांच्या आश्रमात ही गाडी होती त्यामुळे धूळखात पडलेल्या या गाडीची नव्याने डागडुजी करून गाडगेबाबाच्या आठवणीला उजाळा देण्यात आला, आज नवीन वर्षाला मोठ्या थाटात या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले
