जनतेज न्युज

गुढीपाडवा सणा साठी लागणाऱ्या साखर घाटी व इतर साहित्य विक्रीसाठी बाजारात दाखल

प्रतिनिधी, सातारा : मराठी कॅलेंडर नुसार चैत्र महिन्यातील पहिला सण म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो या नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात व आनंदात करण्यासाठी परंपरेनुसार गुढी उभा करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली आहे या सणानिमित्त लागणारी साखर घाटी व गुढी उभा करण्यासाठी लागणारे कळत सध्या साताऱ्यातील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या करून आजाराच्या पार्श्वभूमीवर व सध्या सुरू असलेल्या युक्रेन आणि रशिया च्या युद्धामुळे कच्च्या मालामध्ये मोठी वाढ झाली असून त्यामुळे साखर घाटीच्या विक्रीदेखील दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती साखर घाटी चे विक्रेते शेखर राऊत यांनी बोलताना दिली आहे