प्रतिनिधी, नाशिक : होळी व रंगपंचमी नंतर येणार सण गुढीपाडवा या गुढीपाडव्यानिमित्त हार- कड्यांची मोठी मागणी असते. मात्र कच्चा माल महागल्याने तसेच कुशल कारागीर यांच्या कमतरतेमुळे अक्षरशा चार पिढ्यांपासून सुरू असणारा हार-कडे बनवणारा कारखाना यावर्षी बंद करण्याची वेळ येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील शुभम सुराडे या तरुण कारखाना मालकावर आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्त लागणारे हार-कड्यांचे उत्पादन या वर्षी कमी झाले आहे.कारण या व्यवसायासाठी लागणारी दूध, लिंबू ,साखर असा कच्चामाल मार्ग लागतो.मात्र तो महागला असून त्यातच हार- कडे बनवण्यासाठी जे मजूर वर्ग लागतो.त्यांचा अभाव झाल्याने शेकडो वर्षापासून सुरू असणारा कारखाना यावेळी मजुरांना अभावी बंद करण्याची वेळ आली आहे. हार- कड्यांच्या किमती देखील वाढ झाली असून उत्पादनात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. बाहेरून माल घेण्याची वेळ उत्पादक व विक्रेत्यांवर आली आहे.
