जनतेज न्युज

गोंदियातून कार्गो एयर बससेवेने भारतासह विदेशात जाईल शेतकर्‍यांचा कृषीमाल…भंडारा गोंदिया तील भाजी जाईल कार्गो एअरबस ने हैद्राबाद व इंदौर ला..

प्रतिनिधी , गोंदिया : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळभाज्या आणि अन्य शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यादृष्टीने गोंदिया येथून कार्गो एअर बस सुरू करण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आढावा घेता यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता लवकरच गोंदिया येथून कार्गो सेवा सुरू होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन हैदराबाद व इंदौर येथे जाणार आहे।
1),, गोंदियातील बिरशी विमानतळ विमानाचे उडाण घेण्यासाठी सज्ज झाला असून आता भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी उत्पन्न घेत असलेल्या फळ, भाजीपाला व इतर कृषीमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे व योग्य दर मिळून त्यांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने कार्गो एयर बस सुरू करण्यात आली आहे।गोंदिया  भंडारात मिरची, काकडी, लौकी, केळे, टरबूज आदींचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असून या सर्व कृषी मालाच्या उत्तम बाजारपेठेसाठी कार्गो एयर सेवा महत्वपूर्ण सिद्ध होणार आहे।
2)तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ही ह्या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या मालाला हैदराबाद व इंदौर ची बाजारपेठ मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे।मात्र यात सरकार ने ह्या प्लेन च्या किराया परवडदनारा असावा व माल सुरक्षेतेची हमी देण्याची मागणी ही शेतकरी व व्यापाऱ्यांनी केली आहे।
3),,भंडारा गोंदिया जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात फळ-भाजी-पीकाचे उत्पादन शेतकरी घेतात जर कार्गो एअरबसने शेतकऱ्यांचा उत्पादीत केलेला शेतमाल भारतासह विदेशात गेला तर नक्कीच ” शेतकऱ्यांना  योग्य भाव मिळेल जेने करून शेतकरी ही सुखावेल।