प्रतिनिधी, बीड : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात शिंदे गटाने वर्चस्व निर्माण केलंय. बीड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती पैकी दोन ग्रामपंचायती वर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचां भगवा फडकला आहे. तर एक ग्रामपंचायत उध्दव ठाकरे यांच्या सेनेने कायम राखली आहे.राज्यातील राजकारणामध्ये शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आले असताना बीड जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये देखील शिंदेंचे वर्चस्व आणि करिष्मा दिसून आला.
बीड तालुक्यातील अंथरवनपिंपरी आणि पिंपरीतांडा या ग्रामपंचायत मध्ये अटीतटीची निवडणूक झाली. यामध्ये शिंदे गटाने बाजी मारत दोन्ही ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. तर बीड तालुक्यातील गवळवाडी ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने विजय मिळवला आहे. यात दोन्ही गटाकडून ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात विजयाचे दावे केले.
