प्रतिनिधी ,जळगाव- नगर विकास विभागाने जळगांव जिल्ह्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीला नगरपंचायत करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत कार्यक्रम सुरू ठेवायचा की बंद करायचा याविषयीही निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रवींद्र भारंबे यांनी दिली आहे. पण नशिराबादच्या ग्रामस्थांमध्ये व उमेदवारांमध्ये यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण असल्याने ग्रामस्थांच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी रवींद्र भारंबे यांना ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यात यावी. याकरता निवेदन देण्यात आले आहे.
