प्रतिनिधी , यवतमाळ : गुटखा विक्रीला बंदी असताना सर्रास ग्रामीण व शहरी भागात विक्री केली जात आहे. घाटंजी येथील एका दुकानात छापा टाकून एक लाख 77 हजार 477 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने केली. एफडीएच्या अधिकार्यांनी घाटंजी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर असलेल्या वक्रतुंड सुगंध सेंटरमध्ये छापा टाकला. यावेळी दुकान मालक उज्वल शंकर ढवळे (रा. देवूपिंड वार्ड, घाटंजी) याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा विक्रीकरिता असलेला साठा जप्त करण्यात आला. यात सुगंधित तंबाखू, पान मसाला, असा एकूण एक लाख 771 हजार 477 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. या प्रकरणी उज्वल ढवळे याच्याविरुद्घ घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला
