जनतेज न्युज

घाटकोपर मधील प्रसिद्ध एसआयईएस शाळेबाहेर आज पालकांनी नर्सरी च्या चिमुरड्याना सोबत घेऊन आंदोलन केले.

प्रतिनिधी , घाटकोपर: शाळेने फेब्रुवारी महिन्यात पालकांकडून नर्सरी ची तब्बल 53 हजार फी घेतली होती.मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाले आणि शाळा बंद झाल्या.त्यामुळे ही भरलेली फी आता पुढच्या येणाऱ्या वर्षात वर्ग करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.मात्र नर्सरी च्या मुलांना देखील ऑनलाइन शिक्षण देत असल्याचे सांगत शाळेने ही फी पुढच्या वर्षात वर्ग करण्यास नकार दिला आहे.तसेच पालकांचे कोणी ही ऐकून ही घेत नाही.त्यांना विश्वस्तनी ही भेटण्यास नकार दिला.लोकप्रतिनिधीनी देखील त्यांना मदत केली नाही.अखेर आज या सर्व पालकांनी शाळेसमोर मूक निदर्शने केली.या वेळी त्यांनी आपल्या पाल्याला ही आंदोलनात सहभागी केले होते.हातात फलक घेऊन या चिमुरड्यानी आपल्याच शाळेबाहेर निदर्शने