जनतेज न्युज

चंदनाची छुपी तस्करी करणाऱ्यास पाठलाग करुन 25,82,880 रकमेच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

प्रतिनिधी , पुणे : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की पुणे-नगर रोड ला अशोक लेलंड कंपनीचा एक टेम्पो क्र. एम एच 17 बी डी 2698 हा नगर च्या दिशेने जात असून त्या मधे चंदनाच्या झाडाची लाकडे अवैद्यरित्या चालवली आहेत अशी बातमी मिळाल्याने लागलीच त्यांनी त्यांच्या पथकांना सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाने तिचा पाठलाग सुरु केला सदर वाहन शिक्रापुर येथे चाकण चौकात आले असता त्याला थांबऊन चालकाकड़े चौकशी केली असता गाड़ी रिकामी असल्याचे त्याने सांगितले परंतु गाडीची पूर्ण झड़ती घेतल्या नंतर गाड़ीच्या हौदया मधे एक छुपा कप्पा जो कि दिसणार नाही अश्या पद्धतीने तयार केला होता. सदर कप्पा उघडून पाहिला असता त्या मध्ये मोठ्या आकाराच्या गोन्यांमध्ये 190 किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे मिळून आली असून आरोपी सूरज कैलास उबाळे वय 24 रा.चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमद नगर याला अटक करण्यात आली मुद्देमालासह शिक्रापुर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली