मागील काही वर्षांमध्ये वीज बिलात सवलत दिली होती शेतकऱ्यांनी आता टप्प्याटप्प्याने भरावं.. उपमुख्यमंत्री अजित पवार
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हे फारच दुःखदायक.. उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रतिनिधी , बारामती (पुणे) : अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद हे अपघाताने मिळाले आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे… कोणाला मंत्री करावं आणि कोणाला कुठलं मंत्री द्याव हे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हेच ठरवत असतात मात्र महाविकास आघाडीचे सरकार असणाऱ्यांनी आपल्या सहकार्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न करू नये .. त्र्यस्थानी केले तर ठीक आहे मात्र महाविकास आघाडी च्या सहकार्यांनी अस वक्तव्य करून एकंदरीत कामकाज पाहत असताना कुठेतरी वाद वाढण्यासाठी मिठाचा खडा टाकू नये अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे .. ते बारामतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलय… चालेलअसताना इतरांनी अस वक्तव्य करणं त्यामुळे त्याबाबत असं वक्तव्य करणं चुकीच आहे..
सरकारी अधिकाऱ्यांनी एकमेकाचा आदर ठेवून वागले पाहिजे… दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हे फारच दुःखदायक आहे या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील यात वरिष्ठ अधिकारी असो किंवा दुसरा कोणीही असो यात पोलिस सर्व प्रकार पुढे आणतील आणि जो कोणी यात जबाबदार असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल…
मागील काही वर्षांमध्ये आपण वीज बिलात सवलत दिली होती त्यामुळे आता येणारे बिल शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने भरावं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे..
