डायग्नोस्टिक सेंटरचे उदघाटन मग सेवा का नाही …
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र एमआरआय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली नसल्याने शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी जिल्हा संघटक मिलिंद साळवे यांनी पालिकेतील क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एमआरआय वैद्यकीय सेवा उपलब्ध न करता जनतेची दिशाभूल करत उद्घाटन करण्यात आले होते.लवकरात ही सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला
;
.
.
