जनतेज न्युज

चैन स्नॅचिंग करणारा गजाआड ; तीन गुन्ह्यांची उकल

प्रतिनिधी , ठाणे : ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील एका महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील चैन हिसकावून पळ काढणाऱ्या एका ठाण्यातील कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी ३ गुन्ह्यांची उकल केली असून त्याच्याकडून ३ लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील पदमिनी रविंद्र मोहंती नामक महिला पायी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीवर गेल्या असता त्या ठिकाणी मोटारसायकल वरून दोन तरुण आले. परिसरातील शनी मंदिराची विचारणा करण्याच्या बहाण्याने त्यांनी महिलेला थांबवले आणि बोलण्यात गुंतवून ठेवले. महिला बेसावध असताना या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यात असलेली १० ग्राम वजनाची चैन हिसकावून दुचाकीच्या मदतीने पोबारा केला. या प्रकरणी मोहंती यांनी ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कंबर कसून तपासाला सुरुवात केली. कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आपल्या सूत्रांच्या मदतीने तसेच तांत्रिक यंत्रणांचा वापर करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.कापुरबावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक स्थापण करून, परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यांची पाहणी, मोबाईलचा तांत्रिक तपास, विश्वसनिय बातमीदार यांना माहिती, सतर्क पेट्रोलिंग, नागरिकांमध्ये जनजागृती अशा अनेक प्रकारे तपास करण्यास सुरुवात केली. मात्र गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा पोलिसांना संशयास्पद तरुणाला ताब्यात घेण्यात यश आले. त्याची सखोल चौकशी केली असता या तरुणाने घोडबंदर रोडवे आजुबाजुचे परिसरात चैन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. मोहम्मद आदीब इश्तेयाक अहमंद अन्सारी असे या तरुणाचे नाव असून हा १९ वर्षीय तरुण खंडुपाडा, भिवंडी येथील रहिवाशी आहे. या महोम्मद अन्सारी कडून पोलिसांनी ६ गुन्ह्यांची उकल केली असून त्याच्याकडून एकुण तीन सोन्याच्या लगड असा एकुण १०५ ग्रॅम व १९ विविध कंपनीचे स्मार्टफोन असा एकूण ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या महोम्मद अन्सारी याने आणखी काही गुन्हे केले आहेत का? त्याच्याकडून आणखी मुद्देमाल हस्तगत होतो का? यात त्याचे आणखी किती साथीदार आहेत? तसेच त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास कापुरबावडी पोलीस करत असल्याची माहिती वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी दिली आहे.