जनतेज न्युज

चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गुलाबराव देवकर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रोगनिदान शिबिर. शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी , जळगाव : चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गुलाबराव देवकर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी माजी आ. कैलास पाटील यांच्यासह नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी विजयाताई पाटील चंद्रहास भाई गुजराती ऍड धनश्याम पाटील नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील उपसभापती सूर्यकांत खैरनार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते या आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला.